सांगली
: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगली जिल्ह्यात गुरुवारी १ हजार ६१८ वाहनांची
विक्री झाली. यामध्ये १ हजार १४४ दुचाकी तर ३५३ चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
यातून सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला तब्बल ६ कोटी ६३ लाख ६ हजार ४८२
रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती आरटीओ प्रसाद गाजरे यांनी दिली. हा महसूल
विक्रमी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सांगलीत
गुरुवारी गुढीपाडव्यानिमित्त वाहन खरदीला मोठी गर्दी झाली होती. मिरज रोड, कोल्हापूर
रोड, माधवनगर
रोडवरील वाहनांच्या शोरुममध्ये ग्राहकांनी सकाळपासूनच गर्दी केली
होती. मुहूर्तावर वाहन नेण्यासाठी ग्राहकांनी यापूर्वीच नोंदणी केली होती. वाहन
खरेदी नोंदणी ऑनलाईन असल्यामुळे शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला याची
माहिती मिळाली. गुरुवारी ग्राहकांनी ११४४ दुचाकी, ३५३ मोटारी,
१० मोपेड, ३६
टॅक्टर, ५७
मालवाहतूक वाहने, रिक्षा
अशा वाहनांची खरेदी केली.
या
वाहनांद्वारे रस्ता सुरक्षा करापोटी १३ लाख ६२ हजार ७६५, तर इतर
करापोटी ६ कोटी ४९ लाख ४३ हजार ६९७,
असा एकूण ६ कोटी ६३ लाख ६ हजार ४६२ रुपयांचा महसूल मिळाला आहे.
0 Comments