मिरज : शहरात एकमेव
असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे साडेचार
कोटी रुपये खर्च करून इमारत पडून आहे. याप्रकरणी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी
गुरुवारी पाहणी केली. मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
मिरजेच्या फुटबॉल
खेळासाठी छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणाची धावपट्टी खराब अवस्थेत आहे.
पावसाळ्यात पाणी साचून या क्रीडांगणाचा तलाव तयार होतो. त्यामुळे फुटबॉल प्रेमी व
क्रीडाप्रेमीकडून या क्रीडांगणाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले. इतका निधी खर्च
करून ही क्रीडांगण सुस्थितीत नसल्याने फुटबॉल प्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
होती. मराठा क्रांती मोर्चाचे नेते विलास देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी
याबाबत अनेकवेळा पाठपुरावा केला. दोन दिवसापूर्वी त्यांनी महापौर धीरज सूर्यवंशी
यांची भेट घेऊन या क्रीडांगणाचे गाऱ्हाणे मांडले. शिवाय या प्रभागातील
नगरसेवक गणेश माळी, दयानंद खोत, बानू जमादार, उज्ज्वला
कांबळे या नगरसेवकांनी महापौरांना व आयुक्तांना याबाबत भेट देण्याची विनंती केली
होती. त्यानुसार आज महापौर सूर्यवंशी यांनी क्रीडांगणाला भेट दिली आणि पाहणी केली.
0 Comments