सांगली : रमजानच्या
पार्श्वभूमीवर सांगलीत इराण, ओमान, सौदी, जॉर्डन आदी देशातील खजुराची मोठी आवक झाली आहे. अगदी शंभर रुपयापासून ते
दोन हजार रुपये किलोपर्यंत यांच्या किंमती आहेत. विविध कारणामुळे यावेळी
खजुरांच्या किंमती जवळपास दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.
मुस्लिम बांधव रमजान
महिन्यात इफ्तारला खजूर खाऊन रोजा (उपवास) सोडतात. यामुळे रमजान महिन्यात खजुराला
मागणी अधिक असते. सांगलीत यंदा इराण, ओमान, सौदी, जॉर्डन अशा विशेषतः अरबी देशातून खजुरांची आवक वाढली आहे, अशी माहिती खजूर आणि ड्रायफ्रुटचे विक्रेते उमेश लाकुळे, अय्यय शेख यांनी दिली. खजूर खाण्यास धार्मिक व शास्त्रीय कारण सांगितले
जाते. रोजा करताना शरीरातील थकवा नाहीसा करण्यासाठी असलेले जीवनसत्त्व यातून
मिळते. मुस्लीम बांधवांकडून रमजानमध्ये सर्वात पहिला कल खजूर खरेदीकडे असतो. सध्या
विविध प्रकारचे खजूर बाजारात विक्रीस दाखल झाले आहे. इराणचे युध्द आणि महागाईमुळे
यावर्षी खजुरांच्या किंमतीत दहा टक्के वाढ झाली आहे. या खजुरांची विक्री संपूर्ण
रमजान महिनाभर होणार आहे. हे खजूर पॅकींग, बॉक्स आणि
खुल्या प्रकारात उपलब्ध आहेत.
खजुरांची प्रति किलो
दर रुपयात असे...
इराण (सुल्ताना) : ३५०
ते ४००
आजवा : २०० ते २५०
ओमान : ३५० ते ४००
सौदी (कलमी) : ६०० ते
९००
इराक : १५० ते २००
कियान : ३०० ते ३५०
सुक्री : ५०० ते ५५०
जॉर्डन मेडझोल : १६००
ते २००
साधी खजूर : १०० ते
१५०
0 Comments