Ticker

6/recent/ticker-posts

उद्योजक बनून तरुणांना रोजगार द्या : विद्या कुलकर्णी

 

सांगली : केवळ अनुदान मिळते म्हणून उद्योग क्षेत्रात न येता चांगले उद्योजक बनून दुसऱ्यानाही रोजगाराच्या संधी द्या, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी केले.

येथील खरे मंगल कार्यालयात पालकमंत्री कार्यालयाद्वारे आयोजित शासकीय योजना संवाद सत्रात विद्या कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री कार्यालयाचे समन्वयक केदार खाडिलकर, चार्टर्ड अकाउंटंट भूपाल सुलह्यान, अमृत योजनेचे जिल्हा व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

विद्या कुलकर्णी म्हणाल्या, उद्योजक होण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, याचा लाभतरुणांनी घेतला पाहिजे. याचा चांगला फायदा घेऊन उद्योजक बनून सन्मानाचे जीवन जगले पाहिजे. यावेळी भूपाल सुल्ह्यान यांनी सबसिडी मिळते म्हणून उद्योगात येऊ नका, तर चांगला उद्योग करा आणि शासनाची सगळी मदत मिळवा.

उद्योजक माधव कुलकर्णी यांनी या कामात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशाप्रकारे मात करता येते याची माहिती दिली.

यावेळी विजय वरुडकर, भाजपच्या नेत्या भारती दिगडे, नगरसेवक मोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, आदी उपस्थित होते. डॉ. भालचंद्र साठे यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments