Ticker

6/recent/ticker-posts

मिटकीच्या प्रवीण कोळपे यांची 'युपीएससी'त बाजी

 

आटपाडी : मिटकी (ता. आटपाडी) येथील प्रवीण उत्तम कोळपे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत देशात ५८४ वी रैंक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

खरसुंडीपासून अर्धा किलोमीटरवरील मिटकी या छोट्याशा गावात प्रवीणचे बालपण गेले. या जेमतेम हजार-बाराशे लोकसंख्या असलेल्या मिटकी (ता. आटपाडी) या छोट्याशा गावात केवळ प्राथमिक शाळेची सुविधा असल्याने येथील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी खरसुंडी येथे जावे लागते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, तर माध्यमिक शिक्षण खरसुंडी येथील सिद्धनाथ माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर सांगली येथील विलिंग्डन कॉलेजमध्ये त्याने उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे आटपाडीतील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात बी.एस्सी. चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी युपीएससीची तयारी सुरू केली. यासाठी ते एक वर्ष दिल्लीत गेले. मात्र तेथील खर्चामुळे आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने ते गावी परतले. कराडमध्ये राहून खासगी शिकवण्या घेत स्वतः अभ्यास करत तब्बल सहा वर्षे त्याने परिश्रम घेतले.

दरम्यान, २०२१ साली त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला. त्याचे वडील उत्तम कोळपे यांचे निधन झाले. मुलाने शिकून मोठे व्हावे, अधिकारी व्हावे, असे स्वप्न वडिलांनी पाहिले होते. मात्र नियतीने त्यांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्रच हिरावून घेतले. या दुः खातून सावरत त्यांनी पुन्हा धैयनि अभ्यासाला सुरुवात केली.

प्रवीण हे कुटुंबातील मोठा मुलगा असून त्यांना एक लहान भाऊ आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आईवर आली. आईने दुःख पचवत स्वतःच्या शेतात काम केले, मोलमजुरी केली आणि मुलाच्या शिक्षणासाठी आवश्यक पैसे उभे केले. अनेकवेळा उसनवार केली, पण मुलाचे शिक्षण थांबू दिले नाही. आईच्या कष्टाचे आणि त्यागाचे चीज करत प्रवीण कोळपे यांनी अखेर यशाचे शिखर गाठले.


Post a Comment

0 Comments