नेलें : नेर्ले (ता. वाळवा) येथील अंकिता अनिल
पाटील (सध्या रा. मुंबई) यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १४० वा
क्रमांक आला आहे.
मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर
झाला. अंकिता या सध्या भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहेत. अंकिता यांनी मुंबई
विद्यापीठातून अभियांत्रिकीतून पदवी घेतली आहे. अंकिता यांनी २०२४ मध्ये केंद्रीय
लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यामध्ये त्यांचा ३०३ वा क्रमांक आला होता.
त्यानंतर अंकिता या भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहेत. अंकिता यांनी २०२५ मध्ये
पुन्हा भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. अंकिता यांचे वडील मुंबई येथे
परिवहन अधिकारी आहेत, तर आई संगणक अभियंता आहे.
0 Comments