सांगली : महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा
परीक्षेतून म्हैसाळ (ता. मिरज) येथील मानतेश पिरगोंडा पाटील यांची
उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गात मानतेश यांनी
राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचे वडील शेतमजूर,
तर आई अंगणवाडी सेविका आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मानतेश
यांनी हे यश मिळवले आहे.
राज्यसेवेची
पूर्वपरीक्षा दि. १ डिसेंबर २०२४ रोजी झाली. मुख्य परीक्षा
जून २०२५ मध्ये, तर मुलाखत ऑक्टोबर २०२५ मध्ये झाली.
या परीक्षेचा तात्पुरता निकाल दि. ५ जानेवारी २०२६ रोजी लागला होता. बुधवार,
दि. ८ एप्रिल रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. यामध्ये मानतेश पाटील
यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली.
मानतेश यांचे
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ म्हैसाळ
येथे झाले. माध्यमिक शिक्षण म्हैसाळच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात झाले.
मिरज येथे बापूजी साळुंखे कला, वाणिज्य व विज्ञान
कॉलेजमध्ये अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. सांगलीत विलिंग्डन
महाविद्यालयातून त्यांनी बीएससीची गणित या विषयातून पदवी घेतली. इंदिरा गांधी
मुक्त विद्यापीठातून एम.ए. (सामाजिक शास्त्र) ही पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी
अतिशय खडतर परिस्थितीतून शिक्षण घेतले. खासगी नोकरी करत राज्यसेवा परीक्षेची तयारी
केली. त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक होत
आहे.
0 Comments