Ticker

6/recent/ticker-posts

झोपडपट्टी पुनर्वसनाला वेग; मोजणीसाठी एजन्सी : महापौर धीरज सूर्यवंशी

 


सांगली : क्षेत्रातील महानगरपालिका झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी झोपडपट्ट्यांची अचूक मोजणी करणे आवश्यक असून, त्यासाठी तत्काळ सक्षम एजन्सी नियुक्त करा, असे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले.

झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात महापालिका मुख्यालयात बैठक झाली. उपायुक्त अश्विनी पाटील, झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजीतकुमार काटे, उपाध्यक्ष तथा नगरसेवक रवींद्र सदामते, संघटन प्रमुख सूरज पवार, सहाय्यक संचालक (नगररचना) हनमंत मारनूर यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेतील पहिला टप्पा असलेल्या मोजणी कामात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी तत्काळ एजन्सी नेमण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. झोपडपट्टीधारकांना त्यांचे हक्काचे आणि दर्जेदार पुनर्वसन मिळावे, यासाठी प्रशासनाने सर्व घटकांशी समन्वय साधून काम करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

महापौर सूर्यवंशी म्हणाले, शहरातील झोपडपट्टीधारकांच्या हिताला आमचे प्राधान्य आहे. पुनर्वसन प्रक्रिया गतिमान करून नागरिकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सकारात्मक पावले उचलत आहे.

Post a Comment

0 Comments