Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासकीय बदलीला परिचारिका संघटनेचा विरोध

 

सांगली :  प्रशासनाने काढलेली प्रशासकीय बदली ही अन्यायकारक असून, त्याला विरोध करण्याचा निर्णय पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा सांगलीच्यावतीने घेण्यात आला. शुक्रवारी द्वारसभा घेऊन ही माहिती देण्यात आली.

यामध्ये प्रशासनाने काढलेली प्रशासकीय बदली ही अन्यायकारक असून परिचर्या संवर्ग हा ९० टक्के महिला तसेच परिचारिकांच्या हाती कोणतीही आर्थिक जबाबदारी नसताना परिचारिकांचे कुटुंब विस्कळीत करणे हे योग्य नाही. परिचारिकांना प्रशासकीय बदलीतून वगळण्यात यावे, असे मत व्यक्त करण्यात आले.

याबाबत आझाद मैदान मुंबई येथे १८ मेपासून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम ढमाले, सचिन बिरणगे, माधव केंद्रे, सारिका हाके, निर्मला मैत्री, प्रदीप मुचंडी, ज्योती आरगे, प्रेमानंद मोरे, वैशाली पोखरणीकर, तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments