पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात
एमपीएससीद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२४ परीक्षेचा अंतिम
निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत सोलापूर
जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. सोलापूरच्या विजय नागनाथ लामकाने यांनी
सर्वसाधारण तसेच मागासवर्गीय गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर,
महिलांमधून सोलापूरच्याच आरती परमेश्वर जाधव या राज्यात प्रथम आल्या
आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा
आयोगातर्फे दि. २७ ते २९ मे, २०२५ या
कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवार, दि. ८
एप्रिल २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार
विविध २० संवर्गातील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत असल्याचे
आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाने उमेदवारांच्या माहितीसाठी अंतिम
निकालासोबतच प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण
(कट-ऑफ) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. यामुळे उमेदवारांना स्वतःची
कामगिरी आणि स्पर्धेची पातळी समजण्यास मदत होणार आहे.
0 Comments