सांगली : शेतकरी सधन झाला तरच जिल्हा सधन होणार आहे, यामुळे शेतकऱ्यांना व्यापारी करण्याचा प्रयत्न मी आपल्या कार्यकालात केला.
याला महसूल विभागासह अन्य विभागांतील अधिकाऱ्यांकडून टीमवर्क साथ मिळाली, असे प्रतिपादन सांगलीचे माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाल्यानंतर माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा
शुक्रवारी जिल्हा प्रशासनतर्फे विशेष सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी ते
बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष अध्यक्षस्थानी होते.
जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या
कार्यक्रमास काकडे यांच्या पत्नी शरदिनी काकडे, अप्पर
जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.
स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी सतीश कदम, समाधान शेंडगे, नीता सावंत,
विजया यादव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
काकडे म्हणाले की, 'माझी सांगली,
माझा अभिमान' या संकल्पनेतून सांगलीतील
कार्यकालात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. याचे श्रेय महसूल विभागासह अन्य विभागांच्या
उत्कृष्ट टीम वर्कला द्यावे लागेल. महसूल विभाग, आरोग्या
विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग अशा
अनेक विभागांनी दिलेल्या सहकार्यामुळे चला शेतकऱ्यांना व्यापारी करूया, दिव्यांग सक्षमीकरण, घरेलु कामगार आरोग्य शिबिर,
एचआयव्ही बाधितांचा वधु-वर मेळावा, मुलींना
कराटे प्रशिक्षण, असे अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवता आले.
समाज सर्वांचा मिळून होतो. त्यामुळे समाजाभिमुख काम करताना उदात्त ध्येय ठेवून
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामकाज करावे, असे आवाहनही
त्यांनी केले. सांगलीशी आपला कायम ऋणानुबंध राहील, असे
भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
0 Comments