Ticker

6/recent/ticker-posts

रंजन शर्मा कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे पोलिस महानिरीक्षक; फुलारींची सीआयडीकडे बदली

 


कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) विशेष पोलिस महानिरीक्षकपदी शुक्रवारी नियुक्ती झाली. तर, पुणे येथील पोलिस सहआयुक्त रंजन शर्मा यांच्यावर कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. शर्मा २५ मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत.

सुनील फुलारी यांनी डिसेंबर २०२२ मध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचा विशेष पोलिस महानिरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत फुलारी यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण क्षेत्रात संघटित गुन्हेगारीविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत टोळ्यांच्या म्होरक्यांसह साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारला होता. गुटखा, शस्त्रास्त्र, अमली पदार्थ, भेसळ दारूसह काळेधंदेवाल्यांविरुद्ध जोरदार मोहीम राबविली होती. कोल्हापूरचे नवे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन शर्मा महाराष्ट्र केडरचे २००६ बॅचचे भारतीय पोलिस सेवा अधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेतून थेट भरतीद्वारे सेवेत प्रवेश केला. सध्या पुणे शहर सहआयुक्त पदावर ते कार्यरत होते.


Post a Comment

0 Comments