सांगली : नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास
विलंब होत आहे. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचून नागरिकांची
गैरसोय होऊ नये,
यासाठी आयुक्त संजीता महापात्र यांच्या आदेशानुसार महापालिका
प्रशासनाने स्वतःच्या यंत्रणेमार्फत तातडीने मुख्य नालेसफाईस प्रारंभ केला आहे.
पहिल्या दिवशी ३० टन गाळ उपसण्यात आला.
आरोग्य व स्वच्छता विभागाच्या उपायुक्त स्मृती पाटील
यांनी स्वतः उपस्थित राहून शामराव नगर परिसर आणि कुपवाड येथील चैत्रबन नाला
स्वच्छता मोहिम सुरू केली. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आधुनिक यंत्रसामग्रीचा
वापर करून नाल्यांमधील
सांगली महापालिकेने स्वतःच्या यंत्रणेमार्फत मुख्य
नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात केली.
साठलेला गाळ आणि कचरा काढून पाण्याचा प्रवाह मोकळा
करण्याचे काम सुरू केले आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शामराव नगर मुख्य नाल्यातन
२० टन गाळ,
तर कुपवाड चैत्रबन नाल्यातन १० टन गाळ काढण्यात आला आहे.
पावसाळ्यात नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरू नये आणि
जनजीवन विस्कळीत होऊ नये, हा प्रशासनाचा मुख्य
उद्देश आहे. कामाची निकड आणि वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन शनिवार आणि रविवार या
सुट्ट्यांच्या दिवशीही नालेसफाई मोहीम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय
प्रशासनाने घेतला आहे. शहरातील सर्व मुख्य नाल्यांची स्वच्छता करून ते रुंद आणि
खोल करण्यावर प्रशासनाचा भर असून, या मोहिमेला सहकार्य करावे,
असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments