सांगली : पावसाळा व संभाव्य पूरनियंत्रण यासाठी
महापालिका यंत्रणा सज्ज आहे. महापालिका क्षेत्रात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत
राहणार असून,
सर्व विभागांशी तो वायरलेस आणि वॉक-टॉकीद्वारे जोडण्यात आला आहे,
अशी माहिती आयुक्त संजीता महापात्र यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी शुक्रवारी महापालिकेच्या मंगलधाम प्रशासकीय
इमारतीमधील मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट दिली. पूर्वतयारीची
प्रत्यक्ष पाहणी केली. आयुक्त संजीता महापात्र यांनी महापालिकेतर्फे करण्यात
आलेल्या मान्सून पूर्व नियोजनाची आणि तांत्रिक सज्जतेची सविस्तर माहिती दिली.
आपत्ती व्यवस्थापन केल अत्याधुनिक नियंत्रण कक्ष आणि
वॉर रूमची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. महापालिका क्षेत्रात २४ तास नियंत्रण
कक्ष कार्यरत राहणार असून, सर्व विभागांशी तो
वायरलेस आणि वॉक-टॉकीद्वारे जोडण्यात आला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीवर लक्ष
ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेली सीसीटीव्ही मॉनिटरिंग यंत्रणा आणि वेदर मॉनिटरिंग
स्टेशनच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. महापालिकेने तयार केलेले आपत्ती
मित्र अॅप आणि प्रभागनिहाय तैनात करण्यात आलेली तातडीच्या उपाययोजनांची पथके कशा
प्रकारे काम करणार, याचे सादरीकरण करण्यात आले.
बचाव साहित्य व निवारा केंद्रे शोध व बचाव कार्यासाठी
लागणारे बोट,
कटर, इमर्जन्सी लाईट्स या साहित्याची तपासणी
करण्यात आली. तसेच संभाव्य पूरबाधित सखल भागातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी
निश्चित करण्यात आलेल्या निवारा केंद्रांमधील सुविधांचा आढावा घेण्यात आला.
आपत्ती काळात नागरिकांना त्वरित मदत मिळणे अत्यंत
महत्वाचे असते. त्यामुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि
महापालिका यांनी अत्यंत समन्वयाने काम करावे, अशा सूचना
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिल्या.
यावेळी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे
सहाय्यक आयुक्त प्रमोद रजपूत, तांत्रिक अधिकारी
बांदेनावाझ पिरजादे व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments