सांगली : 'जागतिक पर्यावरण दिना'चे औचित्य साधून सांगली महानगरपालिकेच्या वतीने शहराचे हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने विशेष वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. गव्हर्मेंट कॉलनी परिसरातील नाना-नानी पार्क येथे जिल्हाधिकारी मैनाक घोष आणि महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांच्या प्रमुख उपस्थितीत १०० पर्यावरणपूरक वृक्षांचे रोपण करण्यात आले
शहराचे पर्यावरण संवर्धन करणे
आणि प्रदूषणमुक्त सांगली निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या
उपक्रमासाठी लागणारी सर्व उत्कृष्ट दर्जाची वृक्षरोपे महानगरपालिकेच्या मालमत्ता व
कर विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणाला
पूरक असणाऱ्या विविध देशी वृक्षप्रजातींची निवड करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी
आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः खड्डे खणून व रोपे लावून प्रत्यक्ष श्रमदानातून पर्यावरण
रक्षणाचा संदेश दिला.
जिल्हाधिकारी
मैनाक घोष, आयुक्त संजीता
महापात्र म्हणाले, केवळ वृक्ष लावणे महत्त्वाचे नसून ते जगवणे आणि मोठे करणे ही काळाची गरज
आहे. पर्यावरण समतोलासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक झाड लावून
त्याचे संगोपन करावे. विशेष म्हणजे, आज नाना-नानी पार्कमध्ये लावलेल्या सर्व १०० वृक्षांचे
नियमित पाणी घालणे, खत देणे आणि संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने
स्वीकारली आहे. यावेळी नगरसेवक युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, कीर्ती देशमुख आणि अलका ऐवळे यांच्यासह उपायुक्त
अश्विनी पाटील,
सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, सहाय्यक आयुक्त
विनायक शिंदे, पर्यावरण संवर्धन अधिकारी क्रतुराज यादव,
मुख्य उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांच्यासह मालमत्ता कर व उद्यान
विभागातील सर्व अधीक्षक, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक
उपस्थित होते.
0 Comments