Ticker

6/recent/ticker-posts

विषारी दारूप्रकरणी अकरा जणांना अटक

 


मिरज : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी घेतली. विभागीय उपायुक्त व उत्पादन शुल्कचे अधीक्षक हे दोघेही फिल्डवर उतरून त्यांनी कारवाई सुरू केली. काल सांगली जिल्ह्यातील ११ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली.
बनावट दारू, हातभट्टीची दारू किंवा अन्य बेकायदेशीर दारूची निर्मिती, विक्री, वाहतूक करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे थेट आदेश त्यांनी यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर ते स्वतः आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगली जिल्ह्याचे अधीक्षक प्रदीप पोटे व त्यांच्या टीमने सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. अनेक ठिकाणी तपासणी केली.
त्यांनी काल दिवसभरामध्ये मिरज, जत, कवठेमहांकाळ, विटा यासह अनेक तालुक्यामधील अनेक ठिकाणी कारवाई करून एकूण ११ गुन्हे दाखल केले. त्यापैकी ९ वारस गुन्हे, तर २ बेवारस गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी एकूण ११ आरोपीना अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमध्ये ३२.७६ बल्क लिटर इतकी देशी दारू, ८५० लिटर रसायन, ३५ बल्क लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर म्हणाले, मी सांगली जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. त्यांनी या बनावट दारू वाहतूक, विक्री व निर्मिती करणाऱ्यांवर आणि ठिकाणांवर कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेतच. शिवाय सांगली जिल्ह्यामध्ये अशा कारवाया करण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील पथकांची देखील नियुक्त्ती करण्यात आली आहे. हे पथक गोपनीयरित्या कारवाई करणार आहे.


Post a Comment

0 Comments