Ticker

6/recent/ticker-posts

ई - दुचाकीवरील दामिनींची रोडरोमिओंवर नजर : पोलीस अधिक्षक तुषार दोशींची माहिती

 


सांगली : महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या 'दामिनी पथका'ला अधिक गतिमान करण्यासाठी आता ई - दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन शहरातील अधिकाधिक भागावर प्रभावी नजर ठेवणे शक्य होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी दिली.

महाविद्यालय परिसर, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे तसेच गर्दीच्या भागांमध्ये दररोज ११२ ला १५० कॉल

अधिक्षक दोशी म्हणाले, डायल ११२ सेवेची कार्यक्षमताही वाढत चालली आहे. आपत्कालीन कॉल प्राप्त झाल्यानंतर सरासरी सहा ते सात मिनिटांत पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचत आहेत. दररोज सुमारे १५० कॉल्सना प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळे अनेक संभाव्य गंभीर घटना रोखण्यात मदत होत आहे.

रोडरोमिओ आणि छेडछाड करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे काम दामिनी पथक करते. महिला सुरक्षेला प्राधान्य देत पथक अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच दामिनी पथकासाठी ई-बाईक तसेच पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी खरेदी करण्यात येणार आहेत.

या वाहनांसाठी जिल्हा नियोज समितीकडून निधी उपलब्ध झाल असून काही सामाजिक संस्था रुग्णालयांनीही आर्थिक सहका-केले आहे. पहिल्या टप्प्यात वाहने सांगली शहरात वापरण्या येणार असून त्यानंतर ईश्वरपूर विटा आणि तासगाव येथेह उपलब्ध करून दिली जाणा आहेत.


Post a Comment

0 Comments