Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेने लादलेल्या घरपट्टी वाढीला काँग्रेसचा विरोध

 


सांगली : महापालिकेने शहरवासियांवर लादलेल्या घरपट्टी वाढीला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. महासभेतही विरोध केला जाईल. वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यास देण्याचा प्रस्ताव कोणाकडून आला, कोणाच्या दबावातून आला आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

आ. डॉ. कदम यांनी शुक्रवारी महापालिकेला भेट दिली. काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या दालनात त्यांनी काँग्रेस नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी डॉ. जितेश कदम, मंगेश चव्हाण, संजय मेंढे, फिरोज पठाण, मयूर पाटील, अमित शहा, दिलीप पाटील, विशाल कलगुटगी तसेच नगरसेवक उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत आ. डॉ. कदम म्हणाले, महापालिका निवडणुकीत महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी काँग्रेस व समविचारी पक्षांना चांगली साथ दिली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न महापालिका सभागृहात मांडत राहू. प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरच्या आंदोलनाबरोबरच महासभेतही आवाज उठवत राहू. प्रशासनाने केलेल्या घरपट्टी वाढीवरून नागरिकांमध्ये असंतोष आहे. वाढीव घरपट्टीविरोधात काँग्रेसने आंदोलन केलेले आहे. महासभेतही आवाज उठवत राहू. घरपट्टी हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. पण म्हणून घरपट्टीवाढ लादणे चुकीचे आहे. सर्व संस्था, संघटनांना

आ. डॉ. कदम म्हणाले, शहरातील नागरिक, मतदार हे कोणत्या एका पक्षाचे नसतात, सर्वांचे प्रश्न सोडवणे, सर्व प्रभागात समान निधी मिळणे आवश्यक आहे. विकास कामात, निधी वाटपात काँग्रेस नगरसेवकांवर अन्याय होऊ नये. महापौर, आयुक्तांनी पक्षपात करू नये. सर्वांचे प्रश्न सोडवावेत. सर्वांना समान निधी द्यावा, अशी विनंती महापौर, आयुक्तांना केली आहे.


Post a Comment

0 Comments