सांगली : रिसाला रोड येथील महावितरण कार्यालयात शिरून
कनिष्ठ अभियंत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी
विनायक कोळी (रा. सांगलीवाडी) याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या
कनिष्ठ अभियंता स्मिता सचिन खाडे (वय ३७, रा. कुपवाड) या
गुरुवारी (दि. २३) दुपारी कार्यालयात काम करत असताना संशयित विनायक कोळी तेथे आला.
त्याने विनायक ठोंबरे यांचे कट केलेले वीज कनेक्शन पुन्हा सुरू करून जुनेच मीटर
ठेवण्याचा व नवीन मीटर न बसवण्याचा तगादा लावला.
त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील द्रव पदार्थ
स्वतःच्या अंगावर ओतून आत्महत्येची धमकी दिली, तसेच टेबलवरील
शासकीय फायली विस्कटून आरडाओरडा करत कामकाज बंद पाडले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात
गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
0 Comments