मिरज : वाहतूक पोलिसांकडून शहरात अल्पवयीन वाहनचालक, नियम मोडणारे वाहनचालक यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यात आल्याची
माहिती सपोनि रणजीत तिप्पे यांनी दिली. डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाजवळ
पोलिसांनी ही कारवाई केली.
अल्पवयीन वाहनचालक, विनानंबर प्लेट
दुचाकी, वाहतुकीचे नियम मोडणारे दुचाकी चालक, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांवर ८६ जणांवर पोलिसांनी
दंडात्मक कारवाई केली. पालकांनी अल्पवयीन पाल्यांना वाहने चालविण्यास देऊ नये.
तसेच नागरिकांनी अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे
आवाहन यावेळी सहाय्यक निरीक्षक रणजीत तिप्पे यांनी केले.
0 Comments