सांगली : नरवीर वीर शिवा काशीद यांच्या ३६६ व्या पुण्यतिथीनिमित्त
दि. ३० जुलै २०२६ रोजी खिलारे मंगल कार्यालय, कोल्हापूर रोड,
सांगली येथे आयोजित करण्यात आलेली सांगली जिल्हा जेन्ट्स हेअर कटिंग
अँड स्टायलिंग स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या स्पर्धेचे आयोजन श्री सेना सेवा संघ, सांगली व श्री संत सेना महाराज सलून असोसिएशन, सांगली
यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. तसेच SKYWAY Hair & Makeup
Academy, सांगली, SKYWAY Enterprises, सांगली
आणि ORIGEN Professional यांच्या सौजन्याने स्पर्धेचे यशस्वी
आयोजन करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील ५१ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग
घेत आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. आधुनिक हेअर कटिंग, स्टायलिंग, सर्जनशीलता, कौशल्य
आणि सादरीकरण या निकषांवर परीक्षकांनी स्पर्धकांचे मूल्यमापन करून विजेत्यांची
निवड केली.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक – समर्थ गवळी (आटपाडी)
द्वितीय क्रमांक – स्वप्नील देवकर (सांगली)
तृतीय क्रमांक – मारुती पवार (मालगाव)
उत्तेजनार्थ पारितोषिक – विठ्ठल गायकवाड सांगली.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन
गौरविण्यात आले. स्पर्धेला सांगली महानगरपालिका परिसरासह संपूर्ण सांगली जिल्हा,
कोल्हापूर जिल्हा तसेच विविध तालुक्यांतील नाभिक समाज बांधव,
सलून व्यावसायिक, ब्युटी क्षेत्रातील तज्ज्ञ,
महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजकांच्या
वतीने सन्मानपूर्वक भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
0 Comments