Ticker

6/recent/ticker-posts

घरपट्टीबाबत दिलासादायक निर्णय घेणार : महापौर सूर्यवंशी

 

सांगली : "नागरिकांना चुकीच्या पद्धतीने घरपट्टी आली असेल, तर ती भरा म्हणून आम्ही आग्रह करणार नाही. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. आणखी कुणाच्या हरकती असतील तर ते दाखल करू शकतात, त्यांना दिलासा देण्याचे काम करू," असे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आज ऐकून घेतलेल्या तक्रारी आयुक्त संजीता महापात्र यांना कळविण्यात आल्याचे महापौर म्हणाले.

घरपट्टीबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कुपवाड आणि सांगलीतील घरपट्टी - कृती समितीचे कार्यकर्तेही उपस्थित होते. बांधकाम क्षेत्र, सदनिका आणि रेडरिकनर दराने घरपट्टी आकारणी केल्यामुळे समितीचा आक्षेप आहे. यावर पत्रकार परिषदेत महापौर म्हणाले, "घरपट्टांची आकारणी ही बांधकाम क्षेत्रावर की चटई क्षेत्रानुसार असावी, यासंदर्भात राज्य सरकारचे मार्गदर्शन मागवून घ्यावे. मोकळ्या जागेवरून की बांधकामावरून रेडीरेकनरचे दर ठरवले आहेत? मालमत्ताधारकांनी घेतलेली हरकत मान्य की अमान्य केली, याची माहिती देण्याबाबत प्रशासनाची भूमिका काय आहे, याचा खुलासा बैठकीत सादरीकरण करावे, व्यावसायिक सोडून मंडळांच्या जिम, व्यायामशाळा यांना ठराव घेऊन दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात येईल."

"घरपट्टीच्या १ लाख ६१ हजार मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आल्या आहेत, त्यातून आतापर्यंत १० कोटी रुपयांची घरपट्टी वसूल झाली आहे. १९ हजार ८९० हरकती आहेत. ५ हजार मालमत्तांची फेरतपासणी केली आहे. ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांना कोणतीही नोटीस दिली जाणार नाही. महापौर अभय योजनेला आणि थकबाकीदारांना देखील मुदतवाढ देण्यात येईल. आणखीही नागरिकांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी महापालिकेकडे सादर कराव्यात," असे महापौरांनी स्पष्ट केले. महापौर सूर्यवंशी यांच्यासह उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, गटनेता युवराज बावडेकर, नगरसेवक अभिजित भोसले, अभिजित कोळी, घरपट्टी कृती

'समितीत तन्ज नगरसेवक' "विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार घरपट्टी संदर्भातील समितीत आणखी ११ नगरसेवक घेतले जाणार आहेत. पक्षीय बलाबलानुसार सर्वांना संधी देण्यात येईल. नव्या समितीची बैठक आठवडाभरातच घेऊ. यात काही तज्ञ नागरिकांनाही येऊ," असे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले.

समितीचे सदस्य पद्माकर जगदाळे, हणमंत पवार, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, पराग कोडगुले, सहायक आयुक्त आकाश डोईफोडे, घरपट्टी अधीक्षक वाहिद मुस्ता यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments