जत : जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षीय चिमुकलीवर
बलात्कार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी पांडुरंग कळळी याला न्यायालयाने
फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा गुन्हा 'रेअरेस्ट ऑफ द रेअर'
स्वरूपाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल
दिला.
सरकार पक्षाचे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे
यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाले. या प्रकरणाचा
तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली वेगाने
पूर्ण करण्यात आला होता.
परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या
१३ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणातील सर्व पुरावे आणि
साक्षीदारांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या
निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना हा कठोर इशारा असल्याची
प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
0 Comments