जलतरण, ट्रायथलॉन आणि वॉटर पोलोमध्ये ११४ पदकांची कमाई
सांगली
: जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर पुणे येथील
नंदिनी जितेंद्र मेणकर हिने क्रीडाविश्वात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वयाच्या
अवघ्या तिसऱ्या वर्षी म्हणजेच १० एप्रिल २००९ रोजी पोहायला सुरुवात करणाऱ्या
नंदिनीने आजवर जलतरण, ट्रायथलॉन आणि वॉटर पोलो यांसारख्या अत्यंत
कठीण स्पर्धांमध्ये तब्बल ११४ पदकांची कमाई करून महाराष्ट्र आणि देशाचे नाव
उंचावले आहे. श्रीलंका येथे झालेल्या वॉटर पोलोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत
नंदिनीचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले.
फक्त सहा वर्षांची असतानाच तिने जलतरण
स्पर्धेत एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकून आपल्या उज्वल भविष्याची नांदी दिली
होती. यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.
शाळास्तरावरीलस्पर्धांमध्ये चमकदार
कामगिरी करत तिने राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली. नागपूर येथील स्पर्धेत ४००
मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण, २०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक,
सोलापूर
येथील स्पर्धात एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक, नांदेड येथे 'स्टुडन्ट
ऑफ द इयर' चित्रपटामध्ये दाखवलेल्या या गेममध्ये नंदिनीने सुवर्णपदक, सातारा
येथील स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. पुणे येथील मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धेत (रनिंग-स्विमिंग-रनिंग)
तिला कांस्य पदक मिळाले.
जलतरणासोबतच धावणे आणि सायकलिंगच्या
मिश्रणातून तयार झालेल्या ट्रायथलॉन (रनिंग-स्विमिंग-सायकलिंग) या अत्यंत
आव्हानात्मक क्रीडा प्रकारातही नंदिनीने मोठे यश संपादन केले. मॅरेथॉन आणि वॉटर
पोलोमध्ये आव्हान स्वीकारले. अवघ्या १० वर्षांची असताना नंदिनीने ३१ व्या पुणे
मॅरेथॉनमध्ये (३ किलोमीटर धावणे) भाग घेतला आणि रौप्य पदक मिळवले. वयाच्या १६ व्या
वर्षी तिने वॉटर पोलो या अत्यंत कठीण सांघिक खेळात प्रवेश केला. ७ ते ८ फूट खोल
पाण्यामध्ये हात-पाय हलवून चेंडू पकडणे आणि क्षमता आणि समन्वय आवश्यक असतो. गोल
करणे, यासाठी प्रचंड शारीरिक केरळ येथील पहिल्या स्पर्धेत नंदिनीने
पहिल्याच प्रयत्नात कांस्य पदक जिंकले. उत्तराखंड स्पर्धा (२०२२) १९ वर्षांची
असताना, नंदिनीने २५-२६ वर्षांच्या खेळाडूंच्या महाराष्ट्र संघात सहभाग
घेतला. उणे ४ अंश सेल्सियस इतक्या थंड पाण्यातील या स्पर्धेत तिच्या संघाने रौप्य
पदक मिळवले, जी तिची अविश्वसनीय
जिद्द दर्शवते.
तिच्यासोबत अनेक मित्रांनी स्विमिंग
सोडून दिले. पण नंदिनीने १४ वर्षाच्या प्रवासात कधीच हार मानली नाही. तिने आजवर
मिळवलेली ११४ पदके आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
हे यश अभिमानास्पद आहे. नंदिनीचे आजोबा
रामचंद्र, आजी लीलावती हे शिराळा येथील आहेत. तिच्च्या या यशाचे कौतुक
करण्यासाठी शिराळा येथे व्यापारी सभागृहात तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी
युवा नेते रणजितसिंह नाईक, शंकर सोनटक्के, गजानन सोनटक्के,
मुबारक
मुल्ला, सुजाता मेणकर, बाळासाहेब सोनटक्के, प्राजक्ता
कुलकर्णी आदी उपस्थित होते.

0 Comments