Ticker

6/recent/ticker-posts

कुपवाडच्या राणाप्रताप मंडळास उपविजेतेपद

 


कुपवाड : सांगलीत आयोजित केलेल्या किशोर किशोरी जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुपवाडमधील राणाप्रताप मंडळाने किशोर, किशोरी गटात उपविजेतेपद पटकावले.

सांगलीतील शिवाजी स्टेडियमवर झालेल्या किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुपवाड येथील राणाप्रताप मंडळाच्या किशोर व किशोरी दोन्ही संघांनी उपविजेतेपद मिळवले. किशोरी गटात आराध्या पाटील हिला स्पर्धेतील उत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून गौरवण्यात आले, तर किशोर गटात सोहम पाडळे यास स्पर्धेतील उत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरवण्यात आले. किशोर संघात राणाप्रताप मंडळाचा सोहम पाडळे, पाटील, सुमेद पुणेकर, श्रीजल मेलशंकरे, आदित्य खांडेकर, श्रेयस आगलावे, विराज निकम, रिझवान ढोले, श्रेयांक पाटील, तन्मय जमदाडे, सुमेद कांबळे, अथर्व कांबळे, वैभव माळी, निखिल कांबळे, श्लोक नरदेकर, तर किशोरी संघात मंडळाची सानवी कुंभार, तन्वी बोरगावे, आरोही साखळकर, रोहिणी बिरादार, आराध्या पाटील, वेदिका पाटील, अक्षरा रजपूत, आर्या थोरात, अनुष्का दुधाळ, हर्षदा रूपनर, दिव्याभारती खांडेकर, लावण्या कांबळे, माहेश्वरी नांगरे, इकरा ढगे, ऊर्वी पाटील यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

निवड झालेल्या खेळाडूंना राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, रमेश पाटील, प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा. सचिन चव्हाण, विशाल बन्ने, शिवसागर पाटील, महेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


Post a Comment

0 Comments