Ticker

6/recent/ticker-posts

संगीत नाट्य महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

 


सांगली : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित संगीत नाट्य महोत्सवास सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महोत्सवाची सुरुवात ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित हृषिकेश बोडस यांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली. पुण्याचे जेष्ठ सी.ए. विजयकांत कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते.
पंडित सुरेश साखळकर, डॉ. शरद कराळे, अभय जबडे व पुणे विभागाचे सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी सहदेव खैरे उपस्थित होते. डॉ. शरद कराळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. चंद्रकांत धामणीकर यांनी प्रास्ताविक केले. पंडित हृषिकेश बोडस म्हणाले, संगीत नाटक ही जगातील एकमेव आगळीवेगळी कला आहे व आपल्या सांगलीची आहे. ती विष्णुदास भावे यांची निर्मिती आहे. सर्वांनी मिळून ती जपली पाहिजे.
श्रीनिवास जरंडीकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी 'संगीत मृच्छकटिक' हे पूर्वी गाजलेले व सध्या दुर्मिळ असलेले हे नाटक सादर करण्यात अली. रजनीनाथ हा नभी उगवला... हेचि पुरुष दैवाचे... माडीवरी चल गं गडे.. रमवाया जाऊ प्रियासी या पदांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या नाटकात चारुदत्त आफळे, गौरी भागवत पाटील, सुनील गोडबोले, डॉ. राम साठे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रवींद्र खरे यांचे दिग्दर्शन होते. पांडुरंग मुखडे यांच्या नेतृत्वाखालील पुण्याच्या भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेने रसिकांना मंत्रमुग्ध केले.




Post a Comment

0 Comments