सांगली :
आमराईतील सिंथेटिक ट्रॅकचे काम दर्जेदार करावे. ड्रेनेज व्यवस्था सुधारणा, विद्युत व्यवस्था, पावसाळी
पाण्याच्या निचऱ्याचे काम दर्जेदारपणे करण्याचे निर्देश महापौर धीरज सूर्यवंशी
यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापौर सूर्यवंशी
यांनी आमराई उद्यान तसेच चिल्ड्रन पार्कला भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील
नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या व सूचना जाणून घेतल्या.
नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या मुद्द्यांची तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना
कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
महापौर धीरज
सूर्यवंशी यांनी आमराईला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. सिंथेटिक ट्रॅक लवकरात
लवकर पूर्ण करणे, ड्रेनेज यंत्रणा सुधारणा, विद्युत सुविधा
उपलब्ध करणे, सांडपाणी व्यवस्थापन सक्षम करणे, परिसरात
साचणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन, पावसाच्या पाण्याचा निचरा, नियमित स्वच्छता, नागरिकांसाठी
आवश्यक माहिती फलक लावणे, तसेच उद्यानातील सर्व खेळणी तत्काळ सुरू करण्याबाबत
निर्देश दिले. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी महापालिका कटिबद्ध
आहे. उद्यान परिसर अधिक सुस्थितीत व सुविधायुक्त करण्यासाठी तातडीने कार्यवाही
करण्यात येणार असल्याचेही महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले. शिवपुतळा परिसर सुशोभिकरण,
मारुती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरणास तत्कालीन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष निधी मंजूर केलेला आहे. त्या कामाचे भूमिपूजन
गुरुवारी शिवजयंती दिनी होणार आहे, अशी माहिती माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी
यांनी दिली.
दरम्यान, उपमहापौर गजानन
मगदूम यांनी बुधवारी पुतळा परिसराला भेट दिली. पुतळा परिसर सुशोभिकरणाला जादा निधी
लागला तर उपलब्ध करू, असे मगदूम यांनी सांगितले. यावेळी
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, ऋषिकेश पाटील उपस्थित
होते.
0 Comments