सांगली :
विश्रामबाग परिसरातील आर सिटी मॉलजवळील रेल्वे प्रशासनाच्या मालकीच्या जागेवरील
कारवाई प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून
“अतिक्रमण” म्हणून करण्यात आलेल्या कारवाईत रेल्वेची जुनी इमारत व अनेक
वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या खोकेधारकांचे बांधकाम पाडण्यात आले.
दरम्यान, रेल्वे अधिकारी कंपाऊंड उभारण्यासाठी घटनास्थळी
आल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत, खोकेधारक संघटना व हमाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र
विरोध दर्शविला. जर ही जागा रेल्वेची असेल, तर महापालिकेने रेल्वेची लेखी परवानगी घेतली होती का,
असा सवाल उपस्थित करण्यात आला. परवानगी नसेल तर
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला.
0 Comments