Ticker

6/recent/ticker-posts

ऑनलाईन पेमेंट प्रक्रियेत १ एप्रिलपासून मोठे बदल

 केवळ पासवर्ड किंवा ओटीपी पुरेसा ठरणार नाही

नवी दिल्ली : ऑनलाईन पेमेंटची सुरक्षितता वाढावी, नागरिकांची फसवणूक टळली जावी, यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑनलाईन पेमेंटशी संबंधित प्रक्रियेत येत्या १ एप्रिलपासून बदल केले आहेत. सर्व ऑनलाईन पेमेंटसाठी द्विस्तरीय पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. केवळ पासवर्ड किंवा ओटीपी पुरेसा ठरणार नाही.

नवीन नियमांनुसार, प्रत्येक पेमेंटसाठी किमान दोन पडताळणी पद्धती आवश्यक असतील. मोबाईल पिन, यूपीआय पिन, फिंगरप्रिंट, ओटीपी अशा इतर पर्यायांची निवड करावी लागणार आहे. लहान रकमेच्या पेमेंटसाठी कमी तपासणी केली जाईल. तर, मोठ्या रकमेसाठी किंवा संशयास्पद व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणी आवश्यक असेल. याला रिस्क-वेस्ड ऑथेंटिकेशन

(जोखीमआधारित प्रमाणीकरण) म्हणतात. परदेशी संकेतस्थळ किंवा अॅप्सवर केलेल्या पेमेंटसाठी, हे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू केले जातील.

यापूर्वी ऑनलाईन व्यवहारांसाठी केवळ पिन क्रमांक पुरेसा होता. आता पासवर्ड किंवा पिन, वनटाईम पासवर्ड (ओटीपी), बोटांचे ठसे, चेहऱ्याची ओळख यासारखा बायोमेट्रिक पासवर्ड, हार्डवेअर टोकन यासारख्या पद्धतीचा वापर केला जाईल. म्हणजेच एकाहून अधिक सुरक्षा प्रणालीचा वापर करावा लागेल.


Post a Comment

0 Comments