सांगली : येथील आलदर चौक ते
स्फूर्ती चौक रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यावरून संताप व्यक्त करत
महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे
गटनेते युवराज गायकवाड यांनी शनिवारी धरणे आंदोलन केले. हे काम तातडीने सुरू न
केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या
प्रयत्नातून या रस्त्यासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर आहे. तीन वर्षांपूर्वीच हे
काम मंजूर झाले आहे. हे काम रेंगाळले होते. या रस्त्यावरील विद्युत खांबांचे
स्थानांतरण न झाल्याने रुंदीकरणाचे काम रखडले होते, पण आता विद्युत
खांबांचे स्थानांतरण करूनही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे
आंदोलन करण्यात आले.
0 Comments