Ticker

6/recent/ticker-posts

यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी संचलित जिनियस पब्लिक स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शन

 

सांगली : शनिवार दिनांक 28/ 2/ 2026 रोजी विज्ञानदिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.  स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. मनीषा पेंडसे सुप्रसिद्ध हॉटेल व्यासायिक या उपस्थित होत्या. पाककला स्पर्धेमध्ये नर्सरी ते चौथी पर्यंतच्या महिला पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता त्यामधून तीन क्रमांक काढण्यात आले. ते  पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक सौ.  पुनम सुतार,द्वितीय क्रमांक, सौ. ज्योती पाटील तर तृतीय क्रमांक सौ. नरगुंदे  या वेळी विजेत्यांचे बक्षीस देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

तसेच विज्ञान प्रदर्शनासाठी संस्थेचे संचालक श्री पी बी पाटील सर  उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच जिनियस पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा जोशी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मेघना ताई कोरे, उपाध्यक्ष मा. श्री. हणमंत राव पवार साहेब सचिव मा. श्री फरास सर सहसचिव मा. बरगाले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.जीनियस पब्लिक स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments