कुपवाड
: माहेरी जाण्यावरून झालेल्या वादातून
पत्नीला बेदम मारहाण करून दोन दिवस खोलीत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार
कुपवाडमध्ये घडला आहे. याप्रकरणी पती सनी दिवाकर मोहिते वय ४९ वर्ष (रा. सुवार्ता
थेटरजवळ बामनोली रोड, कुपवाड याच्याविरुद्ध
कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पत्नी
स्नेहल सनी मोहिते (वय ३३ वर्ष) यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पत्नी स्नेहल मोहिते ही सोमवार (ता.६) रोजी आपल्या पतीला माहेरी जातो असे सांगितले असता पती सनी मोहिते यांने माझ्या वडिलांचा अपमान झाला आहे. तुझ्या भावाने माफी का मागितली नाही? या कारणास्तव पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण केली व तिला दोन दिवस एका खोलीत डांबून ठेवले तिच्या जवळील मोबाईल फोन, एटीएम कार्ड, बँक पासबुक पैसे काढून घेतले. शनिवारी (ता.११) पत्नी स्नेहल मोहिते यांनी कुपवाड पोलिसात धाव घेत पती सनी मोहिते याच्या विरोधात कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली. सदर घटनेची नोंद पोलिसांत झाली असून कुपवाड पोलिसांनी पती सनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments