मिरज
: परशुराम बाबुराव हंगे (वय 50 वर्षे,
रा. बेडग, गणपती मंदिराजवळ) हे काल
सायंकाळपासून बेपत्ता होते. आज सकाळी कॅनलमधील पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.
ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पोलीसांना कळविण्यात
आली.
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस
ठाणे येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन स्पेशल
रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास पाचारण करण्यात आले.
स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने तात्काळ
घटनास्थळी येऊन पाहणी केली व कॅनलमध्ये उतरून मृतदेह बाहेर काढण्याची कारवाई
यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर मृतदेह महादेव वनखंडे यांच्या ॲम्बुलन्समधून मिरज
शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
या कारवाईमध्ये स्पेशल रेस्क्यू फोर्स
आपत्कालीन पथकाचे कमांडर कैलास वडर तसेच सागर जाधव, महेश
गव्हाणे व आसिफ मकानदार यांनी सहभाग घेतला. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
करीत आहे.
0 Comments